देशात वाढत असलेल्या बलात्काराच्या घटनांबाबत आक्षेपार्ह ट्वीट करणाऱा जम्मू-काश्मीरमधील टॉपर प्रशासकीय अधिकारी फैजल शाह यांना नोटीस पाठवण्यात आली असून विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे.

२२ एप्रिल रोजी फैजल यांनी आपल्य ट्वीटर हँडलवरुन भारतात वाढत्या बलात्काराबाबत टिपण्णी केली होती. यावरुन बरीच टीका झाल्याने राज्य सरकारने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. फैजल हे जम्मू-काश्मीर स्टेट पावर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे माजी व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी युपीएससी परिक्षेत टॉप केले होते. काश्मीरमधून या परिक्षेत टॉप करणारे ते एकमेव होते. ते सध्या राज्य सरकारच्या सेवेतून दीर्घ रजेवर असून अमेरिकेत एका शिष्यवृत्तीवर गेले आहेत.

आक्षेपार्ह ट्वीटप्रकरणी त्यांनी काही काळापूर्वी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. दक्षिण आशियातील बलात्काराच्या संस्कृतीवर आपण केलेल्या वक्तव्याबाबत आपल्या वरिष्ठांनी आपल्याला प्रेमपत्र पाठवल्याचे त्यांनी ही नोटीस सोशल मीडियावर पोस्ट करीत म्हटले होते. लोकशाही भारतात सद्दविवेकबुद्धीचे स्वातंत्रावर गदा येत असून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी म्हटले होते.
या नोटीशीत केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील सर्वसाधारण प्रशासकीय विभागाला फैजल यांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. फैजल यांनी आपली विश्वसार्हता गमावली असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फैजल म्हणाले, या वॉरंटनुसार माझ्यावर कारवाई होणार नाही. ही केवळ नोकरशाहीची बंबंदशाही आहे. बलात्कार हा काही सरकारच्या धोरणांतर्गत येत नाही. त्यामुळे बलात्कारावर टीका केली म्हणजे सरकारच्या धोरणांची बाब नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.