मुख्य निवडणूक आयुक्तपदी ओम प्रकाश रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केंद्र सरकारने या संदर्भातली घोषणा केली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या एका पत्रकानुसार ही माहिती समोर आली आहे. अचल कुमार ज्योती यांच्या जागी आता ओम प्रकाश रावत आता काम पाहतील.
अचल कुमार ज्योती यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपतो आहे. त्याचमुळे ओम प्रकाश रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्योती यांच्या आधी नसीम जैदी मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांचा कार्यकाळ जुलै २०१७ मध्ये संपला होता. त्यानंतर अचल कुमार ज्योती यांनी हे पद स्वीकारले. आता ज्योती यांचा कार्यकाळ संपल्याने ओम प्रकाश रावत हे मुख्य निवडणूक आयुक्त असतील. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातली माहिती दिली आहे.
#FLASH Om Prakash Rawat appointed as the new Chief Election Commissioner with effect from 23 January pic.twitter.com/f4L3AXinWk
— ANI (@ANI) January 21, 2018
निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि इतर दोनजण निवडणूक आयुक्त असतात. या दोघांपैकी जो वरिष्ठ असेल त्याच व्यक्तीला मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राष्ट्रपतींतर्फे नेमले जाते. त्याचनुसार ओम प्रकाश रावत हे आता मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत. तर अशोक लवासा हे निवडणूक आयुक्त असणार आहेत अशीही घोषणा करण्यात आली आहे. अशोक लवासा हे याधी अर्थ सचिव म्हणून काम करत होते अशोक लवासाही २३ जानेवारीपासून पदभार स्वीकारणार आहेत.