जम्मू व काश्मीरमध्ये एक महिन्याहून अधिक काळ सरकार अस्तित्वात नाही. पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यातील जनतेला आणखी प्रतीक्षा करायला लावू नये. एक तर सरकार स्थापन करावे किंवा भाजपबरोबरची युती तोडून निवडणुकांना सामोरे जावे असा सल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी दिला आहे.
पीडीपी-भाजप युती तुटल्यास नॅशनल कॉन्फरन्स भाजपला पाठिंबा देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून नेमक्या कोणत्या मागण्या आहेत ते मेहबूबांनी स्पष्ट करावे. फार काळ त्यांना मुद्दय़ाला बगल देता येणार नाही, असे ओमर यांनी सांगितले. विश्वासाचे वातावरण केंद्राने तयार करावे असे मेहबूबा वारंवार म्हणत आहे. मात्र केंद्राकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या हे कोणालाच माहीत नाही.