19 March 2019

News Flash

जम्मू काश्मीर – चकमकीदरम्यान जवानांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर येथील बंदिपोरा येथे लष्कर जवान आणि दहशवाद्यांमध्ये चकमक झाली असून यामध्ये एक जवान शहीद झाला आहे

संग्रहित छायाचित्र

जम्मू काश्मीर येथील बंदिपोरा येथे लष्कर जवान आणि दहशवाद्यांमध्ये चकमक झाली असून यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. यावेळी जवानांनी चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी अद्याप जंगलात लपलेले असून त्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.

बुधवारी सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) चार जवान शहीद झाले, तर तीन जवान यात गंभीर जखमी झाले आहेत.

मंगळवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने सीमा रेषेवरील सांबा जिल्ह्यातील रामगढ आणि चंबलीयाल या भागांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानी सैन्याने या भागांमध्ये भारतीय चौक्यांना लक्ष्य केले. बुधवारी पहाटेपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच होता. चंबलीयाल येथे बीएसएफचे चार जवान पाकच्या गोळीबारात शहीद झाले. तर तीन जवान जखमी झाले.

First Published on June 14, 2018 7:46 am

Web Title: one army personnel dead and two terrorists killed in jammu kashmir