05 December 2020

News Flash

काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार; AK-47 जप्त

शोधमोहिम सुरु

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लारनू भागात शनिवारी सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. यावेळी या दहशतवाद्याकडील एक AK-47 रायफल जप्त करण्यात आली. दरम्यान, परिसरात सुरक्षा रक्षकांकडून शोध मोहिम सुरु आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेमध्ये जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्याने सुरक्षा जवानांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. दहशतवाद विरोधी मोहीम सुरु असताना नाट्यमय घडामोडींनंतर दहशतवाद्याने आत्मसमर्पण केल्याचा व्हिडीओ भारतीय लष्कराने शेअर केला आहे. २० वर्षांचा हा तरुण काही दिवसांपूर्वीच दहशतवादाकडे वळला होता. त्याच्याकडून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 10:45 am

Web Title: one unidentified terrorist neutralised in an encounter with security forces in larnoo area of anantnag jammu and kashmir today aau 85
Next Stories
1 जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत ९४ व्या स्थानी, गंभीर श्रेणीत समावेश
2 ‘या’ महिन्यात भारतामध्ये येणार करोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची महत्वाची माहिती
3 उत्तर प्रदेशात भर बाजारात भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या
Just Now!
X