सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

भाजप आमदार व केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्या बंगळुरू येथील पाच मजली बंगल्याच्या बांधकामास परवानगी नाकारणारा कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला आहे. न्या. मदन बी. लोकूर व एस.ए. बोबडे यांनी सांगितले की, आमच्या मते कर्नाटक उच्च न्यायालयाने काढलेले निष्कर्ष कायद्यानुसार नाहीत. केंद्रीय कायदा मंत्री सदानंद गौडा व माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री डी.एन जीवराज यांनी २०१२ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आव्हान याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने गौडा यांच्या बांधकामाचा मंजूर आराखडा रद्दबातल केला होता. उच्च न्यायालयाने वकील नागलक्ष्मी बाई यांच्या लोकहिताच्या याचिकेवर हा निकाल दिला होता. याचिकेत असे म्हटले होते की, जीवराज व सदानंद गौडा यांनी भाडेपट्टा कराराचे उल्लंघन केले आहे.