News Flash

राज्यांकडे लशींच्या १.६३ कोटी मात्रा शिल्लक

रविवारी सकाळपर्यंत देशभरात ३२,४२,५०३ सत्रांमधून लोकांना लशींच्या एकूण २३,१३,२२,४१७ मात्रा देण्यात आल्या आहेत.

| June 7, 2021 12:20 am

हैदराबादमध्ये करोना लसीकरणासाठी लागलेली रांग.

नवी दिल्ली : राज्ये व केंद्रशासित प्रदेशांजवळ लसीकरणासाठी अद्याप लशींच्या १.६३ कोटींहून अधिक मात्रा शिल्लक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले.

मोफत आणि राज्यांमार्फत थेट खरेदी अशा दोन्ही श्रेणींच्या माध्यमांतून केंद्राने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लशींच्या २४ कोटींहून अधिक (२४,६०,८०,९००) मात्रा दिल्या आहेत. यापैकी वाया गेलेल्या लशी जमेस धरता लशींच्या एकूण २२,९६,९५,१९९ मात्रांचा वापर झाला आहे. एकूण १,६३,८५,७०१ मात्रा अजूनही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत, अशी माहिती मंत्रालयाने दिली. रविवारी सकाळपर्यंत देशभरात ३२,४२,५०३ सत्रांमधून लोकांना लशींच्या एकूण २३,१३,२२,४१७ मात्रा देण्यात आल्या आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 12:20 am

Web Title: over 1 crore vaccine doses left with states says union ministry of health zws 70
Next Stories
1 देशातील सहा राज्यांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीपार
2 लक्षद्वीपच्या मासेमारी बोटींवर सरकारी अधिकारी!
3 प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांना कन्यारत्न
Just Now!
X