News Flash

भारतात तब्बल ५९ हजार ११८ नव्या रुग्णांची नोंद; ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक रुग्णवाढ

देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ इतकी झाली आहे

संग्रहित (PTI)

भारतात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या वाढत असून चिंताजनक परिस्थिती आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल ५९ हजार ११८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ इतकी झाली आहे. दोन आठवड्यांपासून देशातील करोना रुग्णसंख्या सतत वाढत असून केंद्र सरकार वारंवार लोकांना मास्क वापरणं तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन करत आहे.

भारतात गेल्या २४ तासात ५९ हजार ११८ नवे रुग्ण आढळले असून ३२ हजार ९८७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ इतकी झाली असून १ कोटी १२ लाख ६४ हजार ६३७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या ४ लाख २१ हजार ६६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ६० हजार ९४९ इतकी आहे. देशात आतापर्यंत ५ कोटी ५५ लाख ४ हजार ४४० जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 10:14 am

Web Title: over 59000 new covid cases india biggest one day spike since mid october sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची हाक; रस्ते आणि रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा
2 PM Modi Bangladesh Visit: पंतप्रधान मोदी ४९७ दिवसांनंतर परदेश दौऱ्यावर; उद्या प्राचीन मंदिराला देणार भेट
3 “भारतात ३० टक्के मुस्लीम एकत्र आले तर चार पाकिस्तान तयार होतील,” टीएमसी नेत्याचं धक्कादायक वक्तव्य
Just Now!
X