भारताच्या विरोधातील ठराव पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांनी केला असून त्यात त्यांच्या दोन सैनिकांना सीमा सुरक्षा दलाने गोळीबारात ठार केल्याचा निषेध केला आहे. सर्वपक्षीय परिषद इस्लामाबाद येथे झाली त्यात मूळ विषय हा दहशतवादाशी निगडित घटनांमध्ये सामील असलेल्या अतिरेक्यांचे खटले निकाली काढण्यासाठी लष्करी न्यायालये स्थापन करण्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली, परंतु नंतर ३१ डिसेंबरला पाकिस्तानच्या दोन रेंजर्सला भारताने ठार केल्याच्या घटनेची गंभीर नोंद घेण्यात आली असून त्याचा निषेध करीत आहोत असेही म्हटले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे कृत्य हे भ्याड व अनैतिक आहे व त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेल्या लष्करी संकेतांचे उल्लंघन करण्यात आले आहे.