25 September 2020

News Flash

पाकिस्तानला चांगलं माहिती आहे भारताविरोधात आपण यशस्वी होऊ शकत नाही : लष्करप्रमुख

आज २७ ऑक्टोबर इन्फट्री दिनानिमित्त लष्करप्रमुखांनी दिल्लीतील इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्मारकाला भेट दिली आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत

पाकिस्तानला चांगले माहिती आहे की ते भारतविरोधी कारवायांत यशस्वी होऊ शकत नाही, त्यामुळे या परिस्थिती धग कायम ठेवण्यासाठी त्यांना दहशतवादासारखा दुसऱा मार्ग अवलंबावा लागत आहे, असे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटले आहे.

आज २७ ऑक्टोबर इन्फट्री दिनानिमित्त लष्करप्रमुखांनी दिल्लीतील इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्मारकाला भेट दिली आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भु्मिका स्पष्ट केली.

लष्करप्रमुख रावत म्हणाले, पाकिस्तानात विकासाची भाषा करतात मात्र, भारत या सर्व गोष्टींसाठी सक्षम आहे. काश्मीरमधील कोणत्याही कारवायांना उत्तर देण्यासाठी आपण पूर्ण सक्षम आहोत. त्यामुळे पाकिस्तानला भारतासोबत आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही, याची चांगली माहिती आहे.

दगडफेक करणाऱ्यांच्या हल्ल्यात ज्या २२ वर्षीय जवानाने आपल्या जीव गमावला तो लष्करासाठी रस्ते बांधण्याचे काम करणाऱ्या बॉर्डर रोड टीमच्या सुरक्षेसाठी तैनात होता. मात्र, आपल्या जवानाचा जीव गेल्यानंतरही आपल्याकडे काही लोक बोलतात की दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांचे समर्थक समजून नका, हे दुर्देवी असल्याचे लष्कर प्रमुख रावत यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 10:41 am

Web Title: pakistan is fully aware they can never succeed says army chief bipin rawat
Next Stories
1 पैशांसाठी मित्राची हत्या करुन केले 25 तुकडे, आत्महत्या करण्यास नकार देणाऱ्या पत्नीचीही हत्या
2 ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेत स्थानिक निवडणुकांचा समावेश व्हावा : मुख्यमंत्री
3 दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात CISF अधिकारी शहीद
Just Now!
X