01 October 2020

News Flash

पाकिस्तानची नवी कुरापत, राजकीय नकाशात जुनागड आणि लडाखवर सांगितला दावा

पाकिस्तानच्या कृतीची भारताने केली कठोर शब्दांत निंदा

पाकिस्तान सरकारने भारताची नवी कुरापत काढली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यालयाने एक नकाशा पोस्ट केला आहे. पाकिस्तानचा राजकीय नकाशा असे नाव देऊन हा नकाशा पोस्ट करण्यात आला आहे. या नकाशात भारतातील जम्मू काश्मीर, सियाचीन, लडाख आणि गुजरातमधल्या जुनागडवर दावा सांगितला आहे. पाकिस्तानने केलेली ही कृती अत्यंत निंदनीय आणि खोटारडी असल्याचं भारताने म्हटलं आहे. पाकिस्तान सरकारने पोस्ट केलेल्या या नकाशाला काहीही अर्थ नाही. तसंच पाकिस्तानची कृती विचित्र आणि अविचारी आहे असंही भारताने म्हटलं आहे.

पाकिस्तानने हे पाऊल पाच ऑगस्टच्या पूर्वी उचलले आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतले कलम ३७० हटवले होते. बुधवारी त्या गोष्टीला पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. त्याआधीच पाकिस्तानने हे जाणीवपूर्वक ही कुरापत काढली आहे. नव्या नकाशात सियाचीन हा पाकिस्तानचा भाग दाखवण्यात आला असून भारताने या भागावर अवैधरित्या ताबा मिळवल्याची टीका पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केली आहे. तर भारताने पाकिस्तानच्या या कृतीची निंदा केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 8:38 pm

Web Title: pakistan map shows junagarh jammu and ladakh in new political map which released by pm imran khan scj 81
टॅग Pakistan
Next Stories
1 केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान करोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल
2 “तुम्ही लाजू नका, आमची बाबरी मशीद पाडण्यामध्ये…”; भूमिपूजनाच्या ट्विटवरुन प्रियंका यांना ओवेसींचा टोला
3 “आज राजीव गांधी असते तर…”; भूमिपूजनाच्या निमित्तानं कमलनाथांना झाली आठवण
Just Now!
X