जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱया ‘हत्फ-२’ क्षेपणास्त्राची पाकिस्तानने शुक्रवारी चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे तेथील लष्काराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, चाचणी नेमकी कोठे घेण्यात आली, याबद्दल त्यामध्ये काहीही लिहिलेले नाही.
१८० किलोमीटरवरील लक्ष्याचा भेद करण्याची ‘हत्फ-२’ची क्षमता आहे. अण्वस्त्रे आणि पारंपरिक अस्त्रे ‘हत्फ-२’ वाहून नेऊ शकते. जमिनीवरून मारा करणाऱया क्षेपणास्त्रांची सिद्धता तपासण्यासाठी ही चाचणी घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. गेल्या ११ तारखेलाच पाकिस्तानने ६० किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱया ‘हत्फ-९’ क्षेपणास्त्राची चाचणी केली होती.