02 March 2021

News Flash

खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

पोलिसांनी सुरु केली चौकशी.

संग्रहित छायाचित्र

दिल्लीच्या खान मार्केट भागात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास दोन पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेतले. काही जण खान मार्केट भागात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत आहेत, अशी तक्रार मिळाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. या प्रकरणात पोलिसांकडून दोन पुरुष, तीन महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

मध्यरात्री एकच्या सुमारास तुघलक रोड पोलीस ठाण्याचा फोन खणखणला. खान मार्केट मेट्रो स्टेशनजवळ काही जण ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. तपास अधिकारी तिथे पोहोचला, त्यावेळी दोन पुरुष, तीन महिला बाईकवर बसले होते. पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केल्यानंतर आम्ही इंडिया गेट परिसर पाहण्यासाठी आलो आहोत. आम्ही बाईक भाडयावर घेतल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

“बाईक हातात असल्याने वेगात बाईक पळवण्याची आम्ही शर्यत लावली होती. त्यावेळी आम्ही परस्परांचा वेगवेगळया देशांच्या नावांवरुन पुकार करत होतो. एक जण त्यातला पाकिस्तानातून आला होता. त्याने पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिली” असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 11:21 am

Web Title: pakistan zindabad slogan raised near delhis khan market dmp 82
Next Stories
1 ममतांसाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कपडा दाखवण्यासारखं; भाजपा नेत्याची टीका
2 महागाईत तेल!
3 पश्चिम बंगालमध्ये वारसास्पर्धा
Just Now!
X