बंगळुरूमध्ये सीएए आणि एनआरसी विरोधात सुरू असलेल्या रॅलीदरम्यान एका तरुणीनं व्यासपीठावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यावेळी एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं भाषण सुरू होतं. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाऱ्या देणाऱ्या तरूणीचं नाव अमूल्या लियोना असं आहे. अमूल्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या अमूल्याला गुरूवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आमूल्याला गुरूवारी न्यायालयात हजर केलं. कोर्टानं तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपल्या व्यासपीठावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याबद्दल ओवीसी यांनी खेद आणि निंदा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मी नमाज पठण करायला जाताना ही घोषणाबाजी झाली. मी तात्काळ ती थांबवली.

ओवेसी काय म्हणाले ?-
हा सगळा प्रकार ओवेसी यांच्यासमोरच घडला. त्यानंतर ओवेसी यांनी या घटनेवर खुलासाही केला. “तरुणीनं दिलेल्या घोषणांचा मी निषेध करतो. ज्या तरुणीनं घोषणा दिल्या, तिचा आमच्याशी काहीही संबंध नाही. आमच्यासाठी भारतच जिंदाबाद होता आणि जिंदाबाद राहिल,” ओवेसी यांनी या प्रकारावर म्हटलं आहे.