News Flash

शरीफ, भुत्तो, हाफीज सईद यांना मतदारांनी नाकारले

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पनामा पेपर्सप्रकरणी अटक झाली.

पाकिस्तानातील निवडणुकीत मतदारांनी तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांच्या पक्षाला भरभरून मते देतानाच दहशतवाद्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. पाकिस्तानात सत्तेवर येऊ पाहणारा, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद यालाही मतदारांनी सपशेल अव्हेरले आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पनामा पेपर्सप्रकरणी अटक झाली. राजकीय सुडाने ही अटक करण्यात आल्याचा आरोप पीएमएल-एन या पक्षाने केला. त्यामुळे शरीफ यांच्याबद्दल साहनुभूतीची लाट येईल, असे वाटत होते. मात्र पाकिस्तानातील जनतेने शरीफ यांना दुसऱ्या क्रमांकाची मते देऊन सपशेल अव्हेरले आहे. शाहबाज शरीफ यांना मतदारांनी पराभूत केले आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष बिलावल भुत्तो यांनाही पराभव चाखावा लागला आहे. भुत्तो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीझ सईद यालाही मोठा दणका बसला आहे. त्याच्या अल्लाह-ओ-अकबर पक्षाने २५६ उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यांना जनतेने नाकारले आहे. हाफीजच्या पक्षाला अद्याप एकही जागा जिंकता आलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले. इतरही दहशतवाद्यांना मतदारांनी नाकारले. मौलाना मोहम्मद अहमद लुधियानवी याला ४५ हजार मते मिळाली. मात्र तो देखील विजयाच्या जवळपास नव्हता. प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीत त्याचे नाव होते. नंतर ते हटविण्यात आले होते. हाफीजचा मुलगा तहा सईद तसेच जावई खलीद वालेद यानेही निवडणूक लढविली होती. तेहरिक-ए-तालिबान या सुन्नी मुलतत्त्ववादी गटाने शंभर उमेदवार उभे केले होते. मात्र कोणीही विजयाच्या जवळपास आले नाही. धार्मिक पक्षांची सर्वात मोठी आघाडी असलेल्या मुत्तेहिदा मजलीस ए-अमल या पक्षाला विशेष यश मिळाले नाही.

मातब्बरांना धक्का

माजी पंतप्रधान शहबाज शरीफ, जमात-ए-इस्लामीचे प्रमुख सिराजुल हक हे ज्येष्ठ नेते पराभूत झाले. नवाझ शरीफ यांना अपात्र ठरविल्यानंतर अब्बासी यांच्याकडे नेते म्हणून पाहिले जात होते. मात्र दोन्ही ठिकाणहून ते पराभूत झाले. शरीफ यांचे विश्वासू व पंजाबचे माजी कायदामंत्री राणा सनुल्ला फैसलाबादमधून पराभूत झाले. पाकिस्तान पीपल्स पक्षाचे सर्वेसर्वा बिलावल भुट्टो एका ठिकाणहून पराभूत झाले मात्र सिंधमधील लरकाना या ठिकाणी ते विजयी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2018 1:16 am

Web Title: pakistani general election 2018
Next Stories
1 उत्तर प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
2 दिल्लीत तीन चिमुरडय़ा मुलींचा उपासमारीमुळे मृत्यू
3 गोव्यात आम्हाला फक्त चांगले पर्यटक हवेत – गोवा पर्यटन मंत्री
Just Now!
X