06 July 2020

News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या न्यूयॉर्क दौऱ्यासाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दिली माहिती

मोदी

न्यूयॉर्क येथे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाला हवाई हद्दीची परवानगी मिळावी यासाठी भारताने पाकिस्तानकडे केलेली विनंती पाकिस्तानकडून नाकारण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानासाठी आमच्या हवाई हद्दीचा वापर करू देणार नाही, असे आम्ही भारतीय उच्चायुक्तांना कळवले असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले आहे.

२७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याने आज दुपारीच भारताकडून पाकिस्तानला या दौऱ्यासाठी हवाई हद्दीची परवानगी मिळण्यासाठी रीतसर विनंती करण्यात आली होती. मात्र पाकिस्तानने भारताची ही विनंती फेटाळत मोदींच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानचा हवाई मार्ग खुला करण्यास नकार दर्शवला आहे.

भारताने हवाई हद्दीच्या परवानगीसाठी विनंती केल्यानंतर सध्या दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या विनंतीवर सल्लामसलत करुन निर्णय घेण्यात येईल, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले होते.

यापूर्वी पाकिस्तानने जून महिन्यात एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी किर्गिस्तानच्या बिश्केक शहरात जाण्याासाठी पंतप्रधान मोदींच्या विमानाला परवानगी दिली होती. यावेळी देखील भारताने पाकिस्तानकडे हवाई हद्दीची परवानगी मागितली होती. दरम्यान, मधल्या काळात भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील परस्पर राजकीय संबंध तणावाचे बनले आहेत. त्यामुळे ७ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आईसलँड दौऱ्यासाठी जाणाऱ्या विमानाला पाकिस्तानने परवानगी नाकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 8:13 pm

Web Title: pakistans airspace closed for prime minister narendra modis visit to new york msr 87
Next Stories
1 काश्मीरमध्ये संचारबंदी असेपर्यंत भारताशी चर्चा करणार नाही-इम्रान खान
2 मी प्रादेशिक भाषांवर हिंदी भाषा लादण्याचे कधीच बोललो नाही : अमित शाह
3 पश्चिम बंगालचे नाव ‘बांगला’ करा, ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी
Just Now!
X