News Flash

मोहन भागवतांच्या ध्वजारोहणावर आक्षेप घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याची अखेर बदली

केरळ सरकारकडून गुरूवारी पाच जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले.

RSS chief Mohan Bhagwat :

केरळच्या पल्लकड येथील सरकारी शाळेत स्वातंत्र्य दिनी सरसंघचालक मोहन भागवत यांना ध्वजारोहण करू देण्यास मज्जाव करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची अखेर बदली करण्यात आली. केरळ सरकारकडून गुरूवारी पाच जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. यामध्ये पी. मरीकुट्टी यांचाही समावेश आहे.

सरसंघचालक मोहन भागवत मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी शाळेत आले होते. मात्र, पी. मरीकुट्टी यांच्या निवेदनामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांना ध्वजारोहणपासून रोखण्यात आले. सरकारी शाळेमध्ये एखाद्या राजकीय नेत्याच्या हस्ते ध्वजारोहण करणे योग्य नाही. त्याऐवजी शाळेतील शिक्षक किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीने ध्वजारोहण करायला हवे, असे पल्लकडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करनाकियामन शाळेला पाठवलेल्या निवेदनात म्हटले होते. त्यामुळे सुरूवातीला भागवतांना ध्वजारोहणाची परवानगी नाकारण्यात आली. मात्र, भागवतांच्या हस्ते होणारा ध्वजारोहणाचा कार्यक्रम एक वर्षापूर्वीच ठरल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर हा तिढा सुटला होता. दरम्यान, पी. मरीकुट्टी यांची नियुक्ती आता पंचायत संचालक पदावर करण्यात आली आहे.

सत्ता हातात येईपर्यंत संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते- राहुल गांधी

गेल्या अनेक वर्षांपासून केरळमध्ये भाजप आणि रा. स्व. संघ आपले बस्तान बसवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या दरम्यान, अनेकदा संघ आणि डाव्यांमध्ये संघर्ष पहायला मिळाला आहे. अलीकडेच केरळमध्ये या दोन्हींच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. सन २००२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदा आपल्या नागपूर येथील मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकावला होता.

रस्त्यावर नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी घालायचा अधिकार मला नाही- योगी आदित्यनाथ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 3:12 pm

Web Title: palakkad collector p marykutty who barred rss mohan bhagwat from hoisting tricolour transferred
Next Stories
1 दिल्ली हायकोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी
2 चीन-पाकिस्तानपासून धोका नाहीच; खरे चोर भारतात बसलेत- फारुख अब्दुल्ला
3 सत्ता हातात येईपर्यंत संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते- राहुल गांधी
Just Now!
X