पणजीचे महापौर सुरेंद्र फर्ताडो खाडीतील सफाईच्या कामाची पाहणी करताना पाण्यात पडल्याची घटना घडली. ज्या बोटीतून ते पाहणी करत होते तीच उलटल्याने त्यांच्यासह सहा जण पाण्यात पडले. ही घटना नेमकी कधी घडली हे समजलेले नाही. ‘एएनआय’ने या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
बोटीच्या एका बाजूला फर्ताडो यांच्यासह इतर अधिकारी उभे असताना ती सुरुवातीला कलंडली. इतर अधिकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी पूर्ण बोटच पाण्यात पलटी झाल्याने त्यावरील सर्वच जण पाण्यात पडले. यामध्ये कोणालाही कसलीही दुखापत झालेली नसून, सर्वजण सुरक्षित आहेत.