24 October 2020

News Flash

नातवंडं खेळवण्याच्या वयात दिला मुलीला जन्म, पण जन्मताच केली हत्या कारण…

दापंत्याला अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

(संग्रहीत छायाचित्र)

पश्चिम बंगालमध्ये एका दांपत्याने कुटुंबियांकडून अपमान होईल या भीतीने नवजात मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जगलपुरी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. दोघेही नवरा बायको रोजंदारीवर काम करतात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दांपत्याला तीन मुली आणि दोन मुलं आहेत. हे त्यांचं सहावं मूल होतं. इतकंच नाही त्यांना नातवंडंही आहेत.

मायनगुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी नंदकुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलांकडून तसंच नातवंडांकडून अपमान होईल या भीतीने दांपत्याने नवजात मुलीची हत्या केली.

आरोपी पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने चुलत भावाच्या घरी बाळाला जन्म दिला. तिथेच दोघांनी नवजात मुलीची गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर जवळच्या नदीत मृतदेह टाकून दिला होता.

दांपत्याच्या नातेवाईकाला मृतदेह नदीत आढळल्यानंतर त्याने ओळख पटवली. यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासाअंती दांपत्याला अटक करण्यात आली. मंगळवारी दांपत्याला जगलपुरी येथील न्यायालयात हजर करण्यात आलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 5:44 pm

Web Title: parents killed new born girl child in west bengal
Next Stories
1 Aircel-Maxis case : सीबीआयने चिदंबरमनाही केले आरोपी
2 FB बुलेटीन: मराठा समाजाला नोकर भरतीत १६ टक्के आरक्षण आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या
3 RBI ने जारी केला १०० रुपयांच्या नव्या नोटेचा फोटो
Just Now!
X