राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष केले जावे अथवा नाही याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घ्यायचा आहे, असे पक्षाचे नेते राजीव शुक्ला यांनी सांगितले.
राहुल गांधींना पक्षाचे अध्यक्ष करावे अशी मागणी अनेक नेते बऱ्याच काळापासून करत आहेत. पक्षात कुणाला काय स्थान द्यावे, याबाबतचा निर्णय सोनिया गांधी व राहुल गांधी यांनीच घ्यायला हवा, असे शुक्ला म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रामलाल राही यांना पक्षातून काढण्याबद्दल विचारले असता, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मोदींच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेत भाग घेतला, परंतु त्यांना हटवण्यात आलेले नाही. त्यामुळे राही यांना पक्षातून काढण्याची काही इतर कारणे असावीत असे ते म्हणाले.