News Flash

देशात १.१५ लाख नवे रुग्ण

तीन दिवसांत दुसऱ्यांदा रुग्णवाढीचा उच्चांक

(संग्रहित छायाचित्र)

देशात कोविड १९ विषाणूची दुसरी लाट अधिकच संसर्ग पसरवणारी ठरली असून गेल्या चोवीस तासांत १.१५ लाख नवीन रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती देण्यात आली.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात एकूण १ कोटी २८ लाख १७८५ लोक करोनाबाधित झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा रुग्णवाढीचा उच्चांक गाठला गेला आहे. एकूण १ लाख १५ हजार ७३६ इतके रुग्ण गेल्या चोवीस तासांत सापडले आहेत. दिवसातील बळींची संख्या ६३० नोंदवली गेली आहे. २८ व्या दिवशीही वाढीचा कल कायम असून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या आता ८ लाख ४३ हजार ४७३ झाली आहे. हे प्रमाण एकूण संसर्गाच्या ६.५९ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा खाली घसरला असून ९२.११ टक्के झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या १२ फेब्रुवारीला १ लाख ३५ हजार ९२६ होती. ते प्रमाण एकूण रुग्णांच्या १.२५ टक्के होईल. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी १७ लाख ९२ हजार १३५ झाली आहे. मृतांचा दर कमी होऊन तो १.३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

एकूण ६३० नवीन बळी गेले असून त्यात महाराष्ट्रात २९०, पंजाब ६१, चंडीगड ५३, कर्नाटक ३९, उत्तर प्रदेश ३०, मध्य प्रदेश १८, दिल्ली व गुजरात प्रत्येकी १७, तमिळनाडू १५ व केरळ १४ तर राजस्थान १३ अशी आहे. देशात १ लाख ६६ हजार १७७ बळी गेले असून त्यात महाराष्ट्रातील ५६,३३०, तमिळनाडू १२,८०४, कर्नाटक १२,६९६, दिल्ली ११,११३, पश्चिाम बंगाल १०,३५५, उत्तर प्रदेश ८९२४, आंध्र प्रदेश ७२५१, पंजाब ७२१६ याप्रमाणे मृतांची संख्या आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:23 am

Web Title: patient growth peaks for second time in three days abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 एकट्या व्यक्तीनेही वाहनात मुखपट्टी वापरणे अनिवार्य
2 अब्जाधीशांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर
3 ब्राझीलमध्ये एका दिवसात प्रथमच चार हजार बळी
Just Now!
X