आंध्र प्रदेशच्या प्रस्तावित विभाजनाच्या विरोधात ऑक्टोबर महिन्यांच्या पूर्वार्धात येथे हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. मात्र आता येथील परिस्थिती निवळून जनजीवन पूर्वपदावर आल्याने शनिवारी संचारबंदी मागे घेण्यात आली. शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आल्याने संचारबंदी उठविण्यात आली असून नजीकच्या विजयनगरातही गेल्या १० दिवसांत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असे विशाखापट्टणमचे पोलीस उपमहानिरीक्षक पी. उमापती यांनी सांगितले. स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर तटवर्ती क्षेत्रातील शहरांत हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. हिंसक घटनांप्रकरणी पोलिसांनी जवळपास ६०० जणांना अटक केली होती.