News Flash

अधिवेशनाच्या एक दिवस आधी पेगॅससचा रिपोर्ट येणं योगायोग तर नाही; IT मंत्र्यांनी व्यक्त केली शंका

पेगॅसस अहवाल भारतीय लोकशाही आणि तिथल्या संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसतो असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले

माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या खळबळजनक दाव्यामागे कोणतेही तथ्य नाही असे म्हटले

पेगॅसस फोन हॅकिंग प्रकरणावरुन अपेक्षेप्रमाणे सोमवारी संसदेत जोरदार गदारोळ झाला. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत या प्रकरणाबाबत तीव्र शब्दात विरोधी पक्षाला उत्तर दिले. पेगॅसस संदर्भातील अहवालावर त्यांनी शंका व्यक्त केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी पत्रकारांकडून अशा बातम्या येणं हा योगायोग असू शकत नाही असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.

संसदेत गोंधळाच्या दरम्यान वैष्णव म्हणाले की, रविवारी रात्री एका वेब पोर्टलवर अतिशय खळबळ उडवून देणारी बातमी चालवण्यात आली होती. या बातमीमध्ये मोठे आरोप लावले गेले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी अशी बातमी प्रसिद्ध झाली हा योगायोग असू शकत नाही.”

“व्हॉट्सअ‍ॅप पेगॅससच्या वापरासंदर्भात पूर्वी असेच दावे केले गेले होते. त्या अहवालांना कोणतेही तथ्यहीन आधार नव्हते आणि सर्व पक्षांनी नकार दिला. १८ जुलैचा पत्रकार अहवालही भारतीय लोकशाही आणि तिथल्या सुस्थापित संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते”, असे वैष्णव यांनी म्हटले. लोकसभेत विरोधकांनी याप्रकरणी तीव्र निषेध नोंदवला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण देताना सहभागृह तहकूब करण्यास भाग पाडले आणि घोषणाबाजी केली गेली. याबाबत वैष्णव म्हणाले की या खळबळजनक दाव्यामागे कोणतेही तथ्य नाही.

Pegasus Snoopgate : इस्त्रायलच्या पेगॅससची स्वतंत्रपणे चौकशी करा; शशी थरुर यांची सरकारकडे मागणी

भारतासह जगभरातील अनेक देशांची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा कसा वापर करू शकतात, हे ‘द वायर’ या वेबाईटसह आणि अन्य १६ माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून समोर आले आहे. हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे फोन हॅक करण्यात आले असण्याची शक्यता या माध्यम संस्थांच्या ‘प्रोजेक्ट पेगॅसस’मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

Pegasus Snoopgate : “ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला, हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करताहेत”

इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या अनेक सरकारी ग्राहकांनी सूचिबद्ध केलेल्या माहितमधून ३०० हून अधिक भारतीय मोबाईल क्रमांकाचा समावेश आहे. हे मोबाईल क्रमांक मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, विधिज्ञ, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते आणि इतरांनी वापरलेले आहेत, असे शोधपत्रकारितेच्या ‘प्रोजेक्ट पिगॅसस’मधून उघड झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 4:49 pm

Web Title: pegasus snoopgate report a day before the convention is no coincidence it minister expressed doubts abn 97
Next Stories
1 Pegasus Snoopgate : “ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला, हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करताहेत”
2 “मुस्लीम समाजात लोक २-२, ३-३ लग्न करतात आणि १०-१० पोरं जन्माला घालतात, यावर बंधनं आणण्याची गरज”
3 २ वर्षाच्या मुलीला महिला कारमध्ये विसरली, ७ तासांनी परतली तर…
Just Now!
X