हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संक्षयित आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे. सकाळीच आलेल्या या वृत्ताची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे. त्यातही या एन्काउंटरवरमध्ये प्रमुख भूमिका बजावली ती आयपीएस अधिकारी असणाऱ्या व्ही. सी. सज्जनार. ही बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी सज्जनार यांचे अभिनंदन केले आहे.

व्ही. सी. सज्जनार यांनी रात्री तीन ते पहाटे सहाच्या दरम्यान हा एन्काउंटर झाल्याची माहिती दिली आहे. याआधी वारंगल अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपींचाही एन्काउंटरमध्येही सज्जनार यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. २००८ साली वारंगल येथे दोन मुलींवर अ‍ॅसिड हल्ला केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळीही पोलिस आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. तेव्हा या तिघांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्याला प्रतिउत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे तिघेही आरोपी ठार झाले होते. या प्रकरणामध्ये एस. श्रीनिवास राव या मुख्य आरोपीबरोबरच पी. हरी कृष्णन, संजय अशा एकूण तीन जणांना पोलिसांनी ठार केले होते. या तिघांनी मामोनूर येथे स्वप्नीका आणि प्रणीता या मुलींवर अ‍ॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये श्रीनिवासची प्रेयसी स्वप्नीका गंभीर जखमी झाली होती.

अनेकांनी सज्जनार यांचे ट्विटवरुन अभिनंदन केले आहे.

अॅसीड हल्ला प्रकरणासारखाच एन्काउंटर

वारंगल अ‍ॅसिड हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती काल (गुरुवारी) रात्री हौदराबादमध्ये झाली. पोलिस चारही आरोपींना घटनास्थाळी घेऊन गेले होते. नक्की काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी त्यांना पोलिस बंदोबस्तामध्ये घेऊन जाण्यात आले होते. मात्र ज्यावेळी त्यांना काय घडलं हे सांगण्यासाठी मोकळं सोडण्यात आलं तेव्हा त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. पोलिसांनी त्यांना थांबवण्यास सांगितले. मात्र अनेकदा सांगूनही ते थांबले नाही तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्येच चौघाचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.