भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांना क्रिकेट विश्वासह इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ट्विटरवरुन आपल्या शोकभावना व्यक्त करताना या महान खेळाडूच्या कामगिरीबद्दलच्या आठवणीही त्यांनी जाग्या केल्या आहेत.