गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना उत्सुकता असलेल्या ५० आणि २०० रूपयांच्या नोटा अखेर बाजारपेठेत आल्या आहेत. या नोटा मिळवण्यासाठी आज दिल्लीतील भारतीय रिझर्व्ह बँकेबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे बँकेबाहेर मोठी रांग लागल्याचे चित्र दिसत होते. काही नागरिकांनी या नोटांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लवकरच संपूर्ण देशभरातील नागरिकांना ५० आणि २०० रूपयांच्या उपलब्ध होतील.

‘या’ अफवेमुळे चोरांनी बँकेतील चिल्लर पळवली

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी २०० रूपयांची नोट चलनात आणण्यात आली. त्यानंतर ही नोट प्रत्यक्ष बाजारपेठेत येण्यासाठी एका दिवसाचा अवधी जावा लागला. देशात १०० आणि ५०० रूपयांमधील एखादी नोट चलनात आणण्याची ही देशातील पहिलीच वेळ असेल. त्यामुळे २०० रुपयांची नोट फायदेशीर ठरणार आहे. नव्या नोटा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्यांना थोड्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कर चुकवून मोठ्या प्रमाणात रोकड बाळगणाऱ्यांना चाप लावणे हा २०० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याचा उद्देश असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले.