लष्करामध्ये महिला अधिकाऱ्यांची स्थायी स्वरूपाची नियुक्ती करण्याबाबतचा आदेश संरक्षण मंत्रालयाने जारी केला आहे. अस्थायी स्वरूपात नियुक्ती करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांची स्थायी स्वरूपात नियुक्ती करण्याबाबतचा विचार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात दिले होते.

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशामुळे महिलांच्या खांद्यावर अधिक जबाबदारी टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितले. या आदेशामुळे भारतीय लष्करातील सर्वच्या सर्व म्हणजे १० विविध विभागांमध्ये आता महिलांना काम करता येणार आहे.