News Flash

पीएफ खातेधारकांना दिलासा, इपीएफओचा व्याजदर ‘जैसे थे’ राहणार?

व्याजदरात कोणताच बदल केला नाही तर देशातील ६ कोटी पीएफ खातेधारकांना याचा फायदा होईल.

केंद्र सरकारकडून पीएफच्या व्याज दरात कोणताच बदल केला जाणार नसून पीएफचा व्याज दर ८.५५ टक्के राहण्याची शक्यता आहे. व्याजदरात कोणताच बदल केला नाही तर देशातील ६ कोटी पीएफ खातेधारकांना याचा फायदा होईल. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या (सीबीटी) गुरुवारच्या बैठकीत याचा निर्णय होईल. किमान निवृत्ती वेतनात वाढ करून ती दुप्पट केली जाऊ शकते. बैठकीत यावर सहमती झाली तर इपीएफओच्या पेन्शन स्कीमचा सुमारे ५० लाख खातेधारकांना फायदा मिळेल.

‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, सीबीटीचे सदस्य प्रभाकर बानसुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी सीबीटीच्या बैठकीपूर्वी एफआयएसीची बैठक होणार आहे. या बैठकीत पीएफ व्याजदर किती राहील हे स्पष्ट होईल. या व्याजदरात बदल केली जाण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या व्याजदर हा ८.५५ टक्के राहील. सीबीटी ही एक त्रिपक्षीय समिती आहे. यामध्ये सरकार, कर्मचारी आणि श्रम मंत्रालयाच्या कामगार संघटनांचे प्रमुख सहभागी होतात. इपीएफओचे सर्व महत्वाचे निकाल सीबीटीद्वारे घेतले जातात.

यापूर्वी मागील महिन्यात ‘मिंट’ने दिलेल्या वृत्तात पीएफच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, आता व्याजदर जैसे थे राहण्याची शक्यता असतानाही वर्ष २०१९ मध्ये सरकारची ही सर्वांत ज्यात व्याज देणारी योजना बनेल. इतर सरकारी बचत योजनांवर व्याज दर ८.५५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व्याज दरात घट होणार नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे पगारीवर्गाला खूश करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 1:24 pm

Web Title: pf provident fund interest rate may retained by epfo no reduction benefited 60 million subscribers
Next Stories
1 शरद पवारांना शकुनी मामा म्हणता, तुमची औकात काय?-अजित पवार
2 Pulwama Terror Attack: ‘बांधले कफन डोक्याला मी…’
3 गुजरात हाय अलर्टवर! आत्मघातकी हल्ल्याचा गुप्तचर यंत्रणांचा इशारा
Just Now!
X