07 March 2021

News Flash

ननवरील बलात्कार आणि चर्च तोडफोड प्रकरणी ‘पीएमओ चिंतीत’; अहवाल मागवला

पीएमओने दोन्ही घटनांबाबत केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल मागवला आहे. 'पीएमओ'ने टि्वटच्या माध्यमातून ही माहिती दिली.

| March 17, 2015 12:36 pm

पश्चिम बंगालमधील नडिया जिल्ह्य़ात एका ख्रिश्चन शाळेत दरोडेखोरांनी वयस्कर ननवर (जोगीण) केलेला सामूहिक बलात्कार आणि हरियाणाच्या हिस्सारमधील चर्चमध्ये झालेली तोडफोड प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) चिंता व्यक्त केली आहे. पीएमओने दोन्ही घटनांबाबत केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल मागवला आहे. ‘पीएमओ’ने टि्वटच्या माध्यमातून ही माहिती दिली.
दरम्यान, सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण १० जणांना ताब्यात घेतले असून दरोडेखोरांनी बारा लाखांची लूटही केली होती.

यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयानेही पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागवला होता. गृह मंत्रालयाने राज्य सरकारला याबाबत सविस्तर माहिती मागवताना कॉन्वेंटमध्ये योग्य सुरक्षा होती का, असा सवालही केला आहे. त्याचप्रमाणे भविष्यात अशाप्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे, याबाबतही माहिती मागवली आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 12:36 pm

Web Title: pm modi expresses concern over nun gangrape church vandalisation
Next Stories
1 मोदी हे तर साबरमतीचे महंत; रमेश यांचे टीकास्त्र
2 देशभरात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १,७३१
3 अतिवेगवान रेल्वे : मार्गाच्या प्रतिकिलोमीटर उभारणीचा खर्च १०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक
Just Now!
X