पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना लोकसभेत विरोधकांना सुनावलं आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान करोना संकट, अर्थव्यवस्था यासोबतच कृषी कायदे अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असलेले शेतकरी चुकीच्या माहिती आणि अफवांचे बळी ठरले आहेत. आपल्या अफवांचा भांडाफोड होऊ नये म्हणून विरोधीपक्षाचे प्रयत्न आहे. त्यामुळे माझ्या भाषणामध्ये अडथळा आणला जात आहे. हे नियोजित षडयंत्र आहे, असा आरोप केला. यावरुन विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला गोंधळ घालणाऱ्या खासदारांना शांत राहण्याचं आवाहन करत असताना दुसरीकडे विरोधक मात्र शांत होत नव्हते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस खासदार अधीररंजन चौधरी यांना “आता जास्त होत आहे, हा गोंधळ योग्य वाटत नाही” म्हणत आपला संताप व्यक्त केला.
काँग्रेससारखा गोंधळलेला पक्ष देशाचं भलं करु शकत नाही – नरेंद्र मोदी
“आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल ती म्हणजे दिल्लीबाहेर जे आंदोलन सुरु आहे तेथील शेतकरी चुकीच्या माहितीचे शिकार झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या भावनांचा सरकार आणि हे सभागृह आदर करतं. यासाठीच सरकारचे मंत्री त्यांच्याशी सतत चर्चा करत आहेत. आदर आणि सन्मानाने करत आहेत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
सुप्रिया सुळेंसमोर नरेंद्र मोदींची सभागृहात शरद पवारांवर टीका; म्हणाले…
“कृषी कायद्यांमध्ये काही कमतरता असेल तर बदल करण्यात काही समस्या नाही. त्यांनी काही नेमकी गोष्ट सांगितली तर बदल करण्यात कोणताही संकोच नाही. कायदे लागू केल्यानंतर देशात कोणतीही मंडई, एमएसपी बंद झालेलं नाही. हे सत्य असून हे लपवून चर्चा करणं योग्य नाही. कायदा झाल्यानंतर खरेदीतही वाढ झाली आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगताच विरोधकांनी जोरदार गदारोळ केला.
Farmer Protest: अडथळा आणण्याचा हा पूर्वनियोजित कट, कारण…; पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
“हा हल्ला, अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न एका रणनीतीचा भाग आहे. ज्या अफवा पसरवल्या आहेत त्या समोर येतील यासाठी गोंधळ घालण्याचा खेळ सुरु आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. “आधी जे हक्क, व्यवस्था होत्या त्या नवीन कायद्यांनी काढून घेतलं आहे का हे शेतकऱ्यांनी सांगावं. पर्याय असताना विरोध का सुरु आहे. जिथे जास्त फायदा तिथे शेतकरी आपला माल विकू शकतात. या कायद्यात कोणतंही बंधन नसून पर्याय आहेत. जर कायदा लादला असेल तर विरोध करु शकतो,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. “जे झालंच नाही त्याबद्दल भीती निर्माण केली जात आहे. हा सरकारच्या नाही तर लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय असला पाहिजे,” असं मत नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं.