कृषी कायद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाण साधला आहे. शरद पवारांनी २००५ मध्ये एपीएमसी कायद्यात बदल करण्यासंबधी केलेलं वक्तव्य वाचून दाखवत नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान नरेंद्र मोदींनी बोलत होते. यावेळी सभागृहात सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

“एपीएमसी कायदा बदलला आहे असं कोण गर्वाने सांगत होतं, २४ असे बाजार उपलब्ध झाल्याचं कोण सांगत होतं…तर मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील कृषीमंत्री शरद पवार बोलत होते. शरद पवार आज अचानक उलट बोलत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी हा रस्ता का निवडला आहे अशी शंका येते,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.

sunanda pawar ajit pawar
“बारामतीत अनोळखी लोक फिरतायत, वेगळ्या भाषेत…”, रोहित पवारांच्या आईचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या, “धनशक्तीचा…”
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
shrikant shinde on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांनी माझ्या नावाची घोषणा केली असली तरी…” कल्याणच्या उमेदवारीवरून श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया
sharad pawar, madha lok sabha constituency, ncp, bjp
माढ्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची

नरेंद्र मोदी यांनी यावेळी शरद पवारांचं अजून एक उत्तर वाचून दाखवत म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या बचावासाठीच एपीएमसीमध्ये बदल केले जात आहेत. शेतकऱ्यांना मंडईचा पर्याय मिळावा. जास्त व्यापारी नोंद झाल्यास स्पर्धा वाढेल आणि मंडईमधील जाळं संपेल असं त्यांनी सांगितलं होतं”. याशिवाय अनेक सरकारांनी कृषी कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न केले आहेत असंही त्यांनी सांगितलं. भोजपुरीत एक गोष्ट आहे की, ना खेळणार, ना खेळून देणार असं सांगत नरेंद्र मोदींनी विरोधकांना टोला लगावला.