News Flash

नवाज शरीफ यांची ओपन हार्ट सर्जरी; मोदींनी दिल्या सदिच्छा

नवाज शरीफ सध्या लंडनमध्ये असून त्यांची ओपन हार्ट सर्जरी करण्यात येणार आहे.

PM Narendra Modi : शरीफ यांना शस्त्रक्रियेनंतर आठवडाभर रुग्णालयात विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर काम सुरु करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ट्विटरवरून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शस्त्रक्रियेसाठी सदिच्छा दिल्या. नवाज शरीफ सध्या लंडनमध्ये असून त्यांची ओपन हार्ट सर्जरी करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी मोदींनी शरीफ यांना सदिच्छा देत त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे, असेही म्हटले आहे. वैद्यकीय तपासणीसाठी नवाज शरीफ सध्या लंडनमध्ये असून तेथेच त्यांच्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री तसेच शरीफ यांची कन्या मरियम यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शरीफ यांना शस्त्रक्रियेनंतर आठवडाभर रुग्णालयात विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर काम सुरु करतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 12:45 pm

Web Title: pm narendra modi extends best wishes to nawaz sharif for his heart surgery
टॅग : Nawaz Sharif
Next Stories
1 जे काश्मीरमध्ये राहिलेच नाहीत ते आता काश्मिरी पंडितांसाठी भांडतायत- नसिरूद्दीन शहा
2 हिरोशिमा स्मारकाला ओबामा यांची भेट
3 मैत्रीत दहशतीचाच खोडा
Just Now!
X