पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या ६८ व्या जन्मदिन लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये घालवला. वाराणसी येथे मोदींनी आपला वेळ शाळेतील मुलांबरोबर व्यतीत केला. त्यांनी मुलांना जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र दिला. आपल्या दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यासाठी मोदी हे सायंकाळी नरूर येथील प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांबरोबर विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना निडर व्हा आणि प्रश्न विचारल्यानंतर कधी घाबरू नका, असा सल्ला देत भीती दूर करण्यासाठी त्यांनी महात्मा गांधी यांचे उदाहरण दिले. गांधीजी जेव्हा लहान होते तेव्हा ते घाबरत. तेव्हा त्यांची आई त्यांना राम नामाचा जप करण्यास सांगत.

त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगितले. जीवनात विविध क्षमता आत्मसात करणे आवश्यक आहे. कारण त्या नेहमी कामास येतात. पंतप्रधान आपल्याबरोबर असल्यामुळे मुले उत्साहित झाले होते. खेलोगे तो खिलोगे असा सल्ला देत कष्ट करून पुढे जा आणि संकटांना कधी घाबरू नका असे म्हटले.

यावेळी मोदींनी मुलांना शुभेच्छा पत्रांची भेट दिली. त्यांनी शाळेती वाचनालयालाही भेट दिली.