पंतप्रधान नरेंद्री मोदींनी आज (दि. १७) कोची मेट्रो रेल्वेचे उद्घाटन केले. या वेळी केरळचे मुख्यमंत्री पिनारी विजयन, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन उपस्थित होते. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी कोची मेट्रोची सैरही केली.

कोची मेट्रोचा विस्तार २७ किमी इतका केला जाणार आहे. पहिल्या टप्पा १३.३ किमीचा असेल. उर्वरित काम दोन टप्प्यात पूर्ण होईल. मेट्रोसाठी येथे स्वतंत्र फीडर सर्व्हिसची सुविधा असेल. वर्ष २०१३ मध्ये याचे काम सुरू झाले होते. ई. श्रीधरन यांनी या योजनेचे सल्लागार म्हणून काम पाहिले.

kochi-metro-6

या योजनेसाठी ५ हजार १८० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता.

kochi-metro-5

१३.३ किमी या पहिल्या टप्प्यात ११ स्थानके असतील. तर २५ किमीच्या प्रवासात २२ स्थानके असतील.

 

kochi-metro-3

याचे किमान भाडे हे १५ रूपये तर कमाल ३० रूपयेपर्यंत असेल.

kochi-metro-1-1

 

त्याचबरोबर येथे भारतातील एकमेव मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट सिस्टिम असेल. ही देशातील पहिलीच मेट्रो असेल जिथे ट्रान्सजेंडर लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. २३ ट्रान्सजेंडर लोकांनी काम सुरूही केले आहे.