24 September 2020

News Flash

नव्या भारताच्या पायाभरणीसाठी नवं शिक्षण धोरण उपयुक्त – नरेंद्र मोदी

भविष्याचा विचार करुनच नवं शिक्षण धोरण - नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी आज ज्या उंचीवर पोहोचले आहेत, त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे. इतर नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काम करण्याचा पूर्णपणे वेगळा अंदाज आहे.

भविष्याचा विचार करुनच नवं शिक्षण धोरण तयार करण्यात आलं असून नव्या भारताच्या पायाभरणीसाठी नवं शिक्षण धोरण उपयुक्त असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रत्येक देश आपलं ध्येय लक्षात ठेऊन बदल करत पुढे जात असतो. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामागे हाच विचार असल्याचंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील बैठकीला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी नव्या शिक्षण धोरणावर आपलं मत मांडलं.

“आज देशभरात नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होत आहे. वेगवेगळ्या विचारांचे लोक आपलं मत मांडत आहे. शिक्षण धोरणावर मंथन करत आहेत. यावर जितकी जास्त चर्चा होईल तितका शिक्षण व्यवस्थेला फायदा होणार आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “देशातील कोणत्याही क्षेत्र, वर्गाकडून यामध्ये एकतर्फी निर्णय असल्याची टीका झालेली नाही. लोक वर्षांपासून सुरु असलेल्या शिक्षण धोरणात बदल अपेक्षित करत होते आणि तो पहायला मिळत आहे”.

“इतका बदल कागदावर केला पण प्रत्यक्षात कसा आणणार असंही अनेकजण म्हणत असतील. या धोरणाची अमलबजावणी कशी केली जाणार याकडे सर्वांच लक्ष आहे. जे बदल करावे लागतील ते सर्वांनी मिळून करावे लागतील. जिथवर राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे तर मी पूर्णपणे कटिबद्द आणि तुमच्यासोबत आहे. भारताला शक्तिशाली बनवण्यासाठी, विकासाची नवी उंची गाठण्यासाठी, नागरिकांना अजून सशक्त करण्यासाठी, जास्तीत जास्त संधी देण्यासाठी या धोरणात विशेष लक्ष देण्यात आलं आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- शिक्षण मातृभाषेतच का हवं?; पंतप्रधानांनी सांगितलं कारण…

“आमच्या युवकांमध्ये वेगळा विचार विकसित होण्यासाठी शिक्षणाचा हेतूही बदलण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाला सर्जनशीलतेची जोड देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तीन ते चार वर्ष चर्चा केल्यानंतर तसंच लाखोंच्या संख्येने आलेले सल्ले लक्षात घेऊनच राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आल्याचं,” नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

“बदलत्या वेळेसोबत जगदेखील बदलत असून नवे जागतिक मापदंड तयार होत आहेत. हे लक्षात घेता आपल्या शिक्षण धोरणात बदल करणं गरजेचं होतं. शालेय अभ्यासक्रमात १०+२ ऐवजी ५+३+३+४ ची रचना करणं हा त्याचाच एक भाग आहे. घरात बोलली जाणारी भाषा आणि शाळेत शिकवली जाणारी भाषा एकच असल्याने मुलांचा शिकण्याचा वेग वाढतो यामध्ये काही दुमत नाही. यामुळेच पाचवीपर्यंत शक्य झाल्यास मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकवण्याची परवानगी दिली आहे,” असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.

“आतापर्यंत आपली शिक्षण व्यवस्था What to Think यावर लक्ष्य केंद्रीत करत होती. पण या शिक्षण धोरणात How to think यावर जोर देण्यात आला आहे. मुलांना शिक्षण देताना माहिती, शोध, चर्चवर आधारित पद्धतींवर जोर दिला पाहिजे. यामुळे मुलांमधील शिकण्याची इच्छा आणि सहभाग वाढेल,” असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपली आवड जोपासण्याची संधी मिळाली पाहिजे. “सुविधा आणि गरजेनुसार कोणतीही डिग्री किंवा कोर्स करण्याची संधी त्याच्याकडे असली पाहिजे,” असंही नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 11:31 am

Web Title: pm narendra modi on new education policy sgy 87
Next Stories
1 सुशांत सिंह प्रकरण: वादाचा विषय ठरलेला ‘तो’ पोलीस अधिकारी क्वारंटाइनमधून मुक्त
2 मोठी बातमी… पहिल्यांदाच एका दिवसातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे
3 ईडीच्या चौकशीपूर्वी रियाने वकिलांद्वारे केली ‘ही’ मागणी
Just Now!
X