News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना नववर्षाचं गिफ्ट, खात्यात जमा करणार १२ हजार कोटी

PM Kisan Samman Nidhi Government Will Disburse Rs 12,000 Crore :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात येणार आहेत

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकमधील तुमकूर येथे दौरा करणार असून नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना भेट देणार आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार कोटी जमा केले जाणार आहेत. जवळपास आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.

देशभरात अनेक ठिकाणी कापणीचा हंगाम सुरु होणार असून त्याआधी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याने फायदा होईल. आर्थिक वर्षातील हा तिसरा हफ्ता आहे. है पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा करताना लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील अशी घोषणा केली होती. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यावेळी एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास दोन हजार कोटी रुपये जमा करण्यात आले होते.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत थेट खात्यात जमा केली जाते. तीन हफ्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते. प्रत्येक हफ्त्याला दोन हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्याला दिले जातात. पश्चिम बंगालमधील शेतकरी मात्र या योजनेपासून अद्याप वंचित आहेत. तेथील शेतकरी अद्यापही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेशी जोडले गेलेले नाहीत. महत्त्वाचं म्हणजे, लाभार्थी शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात मिळणारा हफ्ता अद्यापही मिळालेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 9:46 am

Web Title: pm narendra modi pradhan mantri kisan samman nidhi scheme tumkur karnataka sgy 87
Next Stories
1 पंतप्रधान मोदी, शाह यांची हत्या का केली नाही?; प्रसिद्ध लेखकाचं खळबळजनक विधान
2 ३१ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी करण्यात आली होती एका नाटककाराची हत्या
3 पॉर्नस्टार मिया खलिफाचा फोटो शेअर करत पाकिस्तानी मंत्र्याची भारतावर टीका
Just Now!
X