News Flash

“पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवणार”- पंतप्रधान नरेंद्र मोदी

५०० ऑक्सिजन प्लांट्सला दिली मंजुरी

संग्रहित (PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवण्यास मंजुरी दिली आहे. द्रवरुप ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वाढ करण्याबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या राज्यांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे त्या राज्यांना लवकरात लवकर हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवण्यात यावेत असे आदेशही पंतप्रधानांनी दिले आहेत.यापूर्वी पीएम केअर फंडातून ७१३ पीएसए ऑक्सिजन प्लांट्स मंजूर करण्यात आले होते. तर आता आणखी ५०० प्लांट्सना मंजुरी देण्यात आली आहे.

हे पीएसए ऑक्सिजन प्लांट्स जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली रुग्णालये तसंच दुसऱ्या श्रेणीच्या शहरांमधल्या रुग्णालयांमध्ये द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा करतील.

हे प्लांट्स संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तसंच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद यांनी स्थानिक उत्पादकांसाठी बनवलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन बसवता येणार आहेत. यामुळे ऑक्सिजन प्लांट्सपासून रुग्णालयांपर्यंत ऑक्सिजन पुरवणं सोपं होणार आहे.

देशात सध्या ऑक्सिजन तसंच इतर वैद्यकीय सुविधांचा तुटवडा भासू लागला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांना प्राणास मुकावे लागत आहे. विशेषतः राजधानी दिल्लीतली परिस्थिती अधिक गंभीर आहे. दिल्ली सरकार तसंच केंद्र सरकार ही समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 5:40 pm

Web Title: pm narendra modi sanctioned 500 new psa oxygen plants from pm cares fund vsk 98
Next Stories
1 ऑक्सिजन सिलेंडर्सच्या काळाबाजार प्रकरणी दिल्लीत दोघांना अटक; ५ सिलेंडर्स जप्त
2 लसीकरण : नोंदणी सुरु झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच CoWIN चा सर्व्हर क्रॅश
3 RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असेल, तरच मतमोजणी केंद्रात मिळणार प्रवेश; आयोगाचा निर्णय
Just Now!
X