भारत हा देश AI साठी अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी ग्लोबल हब व्हावा ही आमची इच्छा आहे. त्या दृष्टीने देशाचे प्रयत्नही सुरु आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाच्या बुद्धिजीवीतेला मिळालेलं एक वरदान आहे. टूल आणि टेक्नॉलॉजी तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.आर्टिफिशियल इंटेलिजन्सची व्हर्च्युअल परिषद आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भारतात ऑप्टिकल फायबरचं नेटवर्क वाढवलं जातं आहे. आम्हाला गतिमान इंटरनेट गावागावांमध्ये पोहचवायचं आहे. एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रमुख भूमिका निभावयाची आहे. भारतात जगातली सगळ्यात युनिक आयडेंटेटी सिस्टीम आहे जिचं नाव आधार आहे. तर सर्वात नावीन्यपूर्ण अशी डिजिटल पेमेंट सिस्टीम आहे ज्याचं नाव युपीआय आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.