News Flash

पंतप्रधान मोदींची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक

देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

संग्रहीत

देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू होणार असून, जगातील या सर्वात मोठय़ा कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसह करोनाविरोधी आघाडीवरील सुमारे तीन कोटी कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी ४ वाजता पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर ऑनलाईन बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यांमधील करोनाची परिस्थिती व लसीकरण अभियानाची कितपत तयारी झालेली आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे.

‘विस्तृत आढावा घेतल्यानंतर, लोहरी, मकर संक्रांत, पोंगल, माघ बिहू इत्यादी सणांच्या पाश्र्वभूमीवर लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला’, असे केंद्र सरकारतर्फे शनिवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर लसीकरणाचा हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

लसीकरण १६ तारखेपासून

‘सीरम इन्स्टिटय़ूट’ने तयार केलेली ऑक्सफर्डची ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशींना भारताने अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली. या दोन्ही लशी सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 8:40 am

Web Title: pm narendra modi to interact with chief ministers of all states via video conferencing today msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 देशभरात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव व्हावा म्हणून शेतकरी आंदोलक बिर्याणी खातायत; भाजपा आमदाराचा दावा
2 ट्रम्प यांचे Twitter Account कायमचे बंद करण्याच्या निर्णयामागे आहे ‘ही’ भारतीय महिला
3 हरियाणात शेतकऱ्यांचा उद्रेक
Just Now!
X