पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या वेळी करोनाचा फैलाव रोखणे, स्थलांतरितांचा प्रश्न आणि ताबलिग जमातमध्ये सहभागी झालेल्यांच्या संपर्कात कोण आले या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता या बाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. करोनाची लागण आणि त्याच्याशी संबंधित प्रश्नांवर दोन आठवडय़ांच्या कालावधीत होणारी ही दुसरी तर केंद्र सरकारने टाळेबंदी जाहीर केल्यानंतर होणारी ही पहिलीच चर्चा आहे.

मरकझ निझामुद्दीन येथे जमलेल्यांना शोधून क्वारण्टाइन करणे आणि चाचण्या घेणे या बाबत अनेक राज्यांमध्ये काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.