26 January 2021

News Flash

पहाटे पाच वाजता फोन करुन पत्नीवर बलात्कार झाल्याची खोटी तक्रार, पोलिसांकडून अटक

पोलिसांनी कारवाई करत खोटी तक्रार दिल्याप्रकरणी तसंच दिशाभूल केल्याप्रकरणी अटक केली आहे

(संग्रहित छायाचित्र)

पोलिसांनी पहाटे फोन करुन खोटी तक्रार देणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने फोन करुन पत्नीवर बलात्कार झाल्याची तसंच हत्या झाल्याची खोटी तक्रार दिली होती. नरेश सिंह असं या व्यक्तीचं नाव असून पोलिसांनी कारवाई करत खोटी तक्रार दिल्याप्रकरणी तसंच पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी अटक केली आहे.

‘पहाटे पाच वाजता त्याने १०० नंबरवर पोलिसांना फोन केला आणि आपल्या पत्नीवर बलात्कार झाला असून, हत्या करण्यात आल्याचा दाव केला. यानंतर पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पण तिथे पोहोचल्यानंतर असं काहीच झालं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं’, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

‘त्याची पत्नीही तिथे उपस्थित होती आणि तिला काहीही झालेलं नव्हतं’, असंही अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पोलिसांनी कारवाई करत नरेश सिंह याला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 12:12 pm

Web Title: police arrest a man for false compaint of wife raped and killed sgy 87
Next Stories
1 काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे की सुशीलकुमार शिंदे ?
2 ‘सॉरी आई बाबा…पुलाखाली तुम्हाला माझा मृतदेह सापडेल’, व्हॉट्सअॅपला मेसेज पाठवून मुलाची आत्महत्या
3 RSS मानहानी प्रकरण: १५ हजारांच्या जातमुचलक्यावर राहुल गांधींना जामीन मंजूर
Just Now!
X