News Flash

धावत्या रेल्वेत कैदी महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार

सुनावणीसाठी महिलेला न्यायालयात १ ऑगस्ट रोजी हजर करण्यात आले होते.

(सांकेतिक छायाचित्र)

तिहार तुरूंगातील एका कैदी महिलेवर पोलीस कर्मचाऱ्यानेच धावत्या रेल्वेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नवी दिल्लीत घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला, असा आरोप पीडित महिलेने केला असुन तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिहार तुरूंगात असलेल्या या महिलेविरूद्ध दिल्लीतील भजनपुरा येथे आणि पश्चिम बंगालमध्ये दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. पश्चिम बंगालमधील खटल्याच्या सुनावणीसाठी महिलेला न्यायालयात १ ऑगस्ट रोजी हजर करण्यात आले होते. यासाठी महिलेसोबत पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील दोन महिला आणि एक पुरूष कर्मचारी पाठवण्यात आले होते. दरम्यान, सुनावणीहून रेल्वेने परत येताना ही घटना घडली. ३-४ ऑगस्टला पोलीस महिलेसह रेल्वेने परत येत होते. रात्रीच्या वेळी महिलेने शौचालयात जायचे असे सांगितल्यावर महिला कर्मचारी तिला रेल्वेतील शौचालयातघेऊन गेल्या होत्या.

याचवेळी तिथे आलेल्या पुरूष कर्मचाऱ्याने बाहेर उभ्या असलेल्या महिला पोलिसांना जागेवर जाण्यास सांगितले. त्यानंतर शौचालयात शिरून जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. दिल्लीत आल्यानंतर महिलेने झालेल्या घटनेची माहिती तिहार तुरूंगातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर हा गुन्हा दिल्ली पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आला असुन दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात महिलेच्या तपासण्यात करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी नमुने तपासणीसाठी पाठविले असुन अहवाल आल्यानंतरच सत्य समोर येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 3:38 pm

Web Title: police raped a prisoner women in runnig train bmh 90
Next Stories
1 सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचा अखेरचा प्रवास सुरु
2 काश्मीरमध्ये सध्या नेमकं काय चाललंय.. जाणून घ्या
3 भारताचा मोठा शत्रू हाफिज सईदला पाकिस्तानी कोर्टाने ठरवलं दोषी
Just Now!
X