News Flash

काश्मीरमधील स्थानबद्ध नेत्यांच्या सुटकेची शक्यता

निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घरी जाऊ देण्याची विनंती केल्यानंतर, त्यांना शनिवारी काही तासांसाठी घरी जाऊ देण्यात आले.

संग्रहित छायाचित्र

५ ऑगस्टपासून स्थानबद्ध करण्यात आलेल्या काश्मिरी राजकीय नेत्यांच्या हालचालींवरील र्निबध जम्मू- काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने यापूर्वीच शिथिल केले असून, यापैकी काही नेत्यांची लवकरच सुटका करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.

निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घरी जाऊ देण्याची विनंती केल्यानंतर, त्यांना शनिवारी काही तासांसाठी घरी जाऊ देण्यात आले. घरातच स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेल्या राजकीय नेत्यांपैकी काहीजणांना प्रकृतीच्या कारणास्तव खोऱ्याबाहेर जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. आमदार निवासात ठेवण्यात आलेल्या काही नेत्यांची सुटका केली जाण्याची शक्यता आहे, अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 1:14 am

Web Title: possibility of the release of local leaders in kashmir abn 97
Next Stories
1 राज्यातील घडामोडींमुळे संघामध्ये नाराजी?
2 अयोध्या निकालानंतरचा संयम प्रशंसनीय!
3 अनिल अंबानींसह चार संचालकांचे राजीनामे फेटाळले
Just Now!
X