चीनच्या शांक्सी प्रांतात एका घरात झालेल्या शक्तिशाली स्फोटात किमान १४ जण ठार तर अन्य १४७ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटामुळे नजीकच्या इमारती आणि गाडय़ांचेही नुकसान झाले आहे.

या स्फोटाचा तडाखा पाच घरांना बसला आणि त्यामुळे शांक्सी प्रांतातील फुगू परगण्यातील क्षीनमिन शहरातील नजीकच्या इमारतींचे नुकसान झाले. या स्फोटातील जखमींपैकी ४१ जणांना उपचार करून घरी पाठविण्यात आले तर १०६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटकांमुळे हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यामुळे नजीकच्या ५८ घरांचे आणि ६३ गाडय़ांचे नुकसान झाले आहे. मदतकार्य आता संपले असल्याचे झिनुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे.