मध्य अमेरिकेत झंझावाती वादळाने फटका दिला असून एकूण नऊ जण ठार झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अरकान्सासचे गव्हर्नर माईक बीबे यांचे प्रवक्ते मॅट डिकॅम्पल यांनी सांगितले की, आमच्या राज्यात अनेक महानगरात या वादळाने आठ जण ठार झाले. त्याच वादळ प्रणालीत स्वतंत्र वादळाने ओखलाहोमा येथे एकाचा बळी घेतला.
लिट्ल रॉक च्या बाहेरील  वादळाचा वेग जमिनीलगत ४८ कि.मी होता. दूरचित्रवाणीवर पडलेल्या इमारती व वाहनांची दृश्ये दाखवण्यात आली. नेब्रास्का, आयोवा व मिसुरी येथे वादळाने तडाखा दिला. ‘टॉरनॅडो वॉचेस’ या नवीन वादळांमुळे न्यू मेक्सिको व पूर्वेकडील टेनिसीला धोका आहे. वादळामुळे निर्माण झालेली प्रणाली त्यातून आणखी वादळे तयार करीत असून या छोटय़ा वादळांनी मिसुरी, मिसीसीपी, नेब्रास्का, आयोवा, टेक्सास व लुईझियानाला धडक मारली.
ओकलाहोमा येथे आपत्कालीन स्थिती व्यवस्थापन संचालक जो डॅन मार्गन यांनी सांगितले की, ऑपॉ या ९०० लोकसंख्येच्या गावास मोठा फटका बसला. निम्मे शहर व अग्निशमन दल यांनाही फटका बसला असून ऑपॉ येथे दोन जण ठार झाले असे नगरपालांचे दूत केली सोशेस यांनी सांगितले. सहा जखमींवर उपचार सुरू आहेत. मिसुरी महामार्ग गस्तीचा ट्रॅक्टर ट्रेलर बाजूला उडाला,मात्र त्यात कुणी जखमी झाले नाही
वादळामुळे निर्माण झालेली प्रणाली त्यातून आणखी वादळे तयार करीत असून या छोटय़ा वादळांनी मिसुरी, मिसीसीपी, नेब्रास्का, आयोवा, टेक्सास व लुईझियानाला धडक मारली.