22 November 2017

News Flash

राष्ट्रपतींचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा रद्द

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चिंताजनक प्रकृतीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्यांचा गुरुवार व

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली | Updated: November 16, 2012 2:23 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चिंताजनक प्रकृतीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्यांचा गुरुवार व शुक्रवारचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा रद्द केला आहे. राष्ट्रपती भवनाच्या वतीने हा दौरा रद्द करण्याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. पण शिवसेनाप्रमुखांच्या अत्यवस्थ प्रकृतीमुळे मुंबईतील माहोल बदलल्यामुळे तिथे समारंभाला उपस्थित राहणे राष्ट्रपतींना उचित वाटले नसावे म्हणून त्यांनी हा दौरा रद्द केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबईत गुरुवारी १५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते जमनालाल बजाज पुरस्कारांच्या वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता, तर शुक्रवारी १६ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे राष्ट्रपतींच्या हस्ते श्री साई निवास धर्मशाळेचा उद्घाटन समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती गंभीर झाल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील बदललेल्या  वातावरणाची दखल घेत राष्ट्रपतींचा दौरा आज सकाळीच रद्द करण्यात आला.     

First Published on November 16, 2012 2:23 am

Web Title: president visit maharashtra for 2 days
टॅग Pranab Mukharji