News Flash

सरकारचा उपयोग देश घडवण्यासाठीच झाला पाहिजे – मोदी

तिरूपती बालाजी मंदिरात जाऊन पंतप्रधान मोदींनी केली पूजा

आंध्र प्रदेशातील जनतेसाठी केंद्र सरकार येथील सरकारला मदत करण्यास सदैव तयार आहे. जनहितासाठी आम्ही नेहमीच कार्यरत राहणार आहोत. आम्हाला सरकारही बनावयाचे आहे व देशही घडवायचा आहे. सरकारचा उपयोगही देश घडवण्यासाठीच झाला पाहिजे. पक्ष वाढवण्यासाठी सरकारचा वापर करणे आमचा स्वभाव नाही व विचारही नाही. असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंध्र प्रदेशमधील सभेत बोलताना म्हटले.

सभेनंतर मोदींनी तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली. याप्रसंगी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची उपस्थिती होती.

श्रीलंका दौरा आटोपून आंध्र प्रदेश येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रविवारी येथील विमानतळावर मुख्यमंत्री जगनामोहन रेड्डी यांनी स्वागत केले. एवढेच नाहीर मुख्यमंत्री रेड्डी यांनी मोदींच्या पाया पडत त्यांचे आशिर्वादही घेतले. यानंतर सभेप्रसंगी  मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे देखील नक्कीच आंध्र प्रदेशाला पुढे घेऊन जातील. तर भाजपा कार्यकर्त्यांचे कौतुक करत आम्ही भाजपा कार्यकर्ते केवळ निवडणुका आल्यावरच मैदानात उतरणारे लोक नाही, तर आम्ही सदैव जनतेच्या सुखा दुखात त्यांच्या बरोबर राहतो. असे त्यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2019 8:15 pm

Web Title: prime minister modi andhra chief minister jaganmohan reddy offer prayers to lord venkateshwara msr 87
Next Stories
1 किश्तवाडात दहशतावद्यांच्या ठिकाणाचा पर्दाफाश
2 म्हणुन राहुल गांधींनी घेतली निवृत्त नर्स राजम्मांची भेट
3 दहशतवादाविरोधात भारत-श्रीलंका एकत्र लढणार : पंतप्रधान
Just Now!
X