News Flash

पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधींना दिल्या दिर्घायुष्याच्या शुभेच्छा

त्यांनी सोनिया गांधींना ७० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

'श्रीमती सोनिया गांधींना जन्मदिनाच्या शुभेच्छा.. ईश्वर त्यांना चांगले आरोग्य व दिर्घायुष्य दे..', असे ट्विट त्यांनी केले आहे. (संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिर्घायुष्य व चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरद्वारे त्यांनी सोनिया गांधींना त्यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
‘श्रीमती सोनिया गांधींना जन्मदिनाच्या शुभेच्छा.. ईश्वर त्यांना चांगले आरोग्य व दिर्घायुष्य दे..’, असे ट्विट त्यांनी केले आहे. सोनिया गांधी यांचा जन्म ९ डिसेंबर १९४६ रोजी झाला होता.

सध्या नोटाबंदीवरून मोदी सरकारला काँग्रेसने संसदेत चांगलेच घेरले आहे. या निर्णयाचा काँग्रेसकडून सर्वाधिक टीका होताना दिसत आहे. त्यातच पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधींना शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत नोटाबंदी निर्णयाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरूवारी त्यांनी पंतप्रधान मोदींचा हा निर्णय मुर्खपणाचा असल्याची टीका केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 10:56 am

Web Title: prime minister narendra modi birthday wishes to congress party president sonia gandhi
Next Stories
1 Black Money in India: नोटाबंदीनंतरची सर्वात मोठी कारवाई, १७० कोटींची रोकड जप्त
2 सॉलोमन बेटाला ७.७ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का
3 हैदराबादमध्ये सात मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू
Just Now!
X