पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय रशिया दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी येथे पाचव्या ईस्टर्न इकोनॉमिक फोरम व दोन्ही देशांमधील २० व्या वार्षिक शिखर संमेलनात सहभागी होतील.

पंतप्रधान मोदी रशियातील प्रमुख शहर व्लादिवोस्तोकला उद्या (४ सप्टेंबर) सकाळी पोहचतील व पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी ते भारतात परततील. परराष्ट्र मंत्रालयाच्या मते या दौऱ्या मागे दोन प्रमुख उद्देश आहेत. पंतप्रधान मोदींना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी पाचव्या ईस्टर्न इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. यानंतर पंतप्रधान मोदी भारत आणि रशिया दरम्यान होणाऱ्या २० व्या वार्षिक शिखर संमेलनात सहभागी होतील.

शिखर संमेलनानंतर दोन अशा घोषणा होणार केल्या जाण्याची शक्यता आहे, ज्या भारत आणि रशियाचा संबंधांना नवी दिशा देतील. ईस्टर्न इकोनॉमिक फोरमला रशियाने २०१५ मध्ये सुरू केले होते यात माजी उद्योग मंत्री २०१८ मध्ये सहभागी झाले होते. तर माजी परराष्ट्रमंत्री २०१७ मध्ये सहभागी झाले होते.