पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या युरोप दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यांनी आज जर्मनीला जाण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळापूर्वी लंडनच्या विमानतळावरून त्यांनी जर्मनीकडे प्रस्थान केले. जर्मनीला जाऊन ते जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांची भेट घेणार आहेत.

मार्केल यांनी बर्लिनमध्ये मोदींसाठी डिनरचे आयोजन केले आहे. जर्मनीसोबतची डिनर डिप्लोमसी भारतासाठी फायद्याची ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अँजेला मार्केल चौथ्यांदा जर्मनीच्या चान्सलर झाल्या आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मार्केल यांची ही पहिलीच भेट आहे. जर्मनी आणि भारत यांच्यातले हितसंबंध वाढवण्यासाठी दोघांमध्ये चर्चा होऊ शकते असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

मागील महिन्यात अँजेला मार्केल यांची चान्सलरपदावर चौथ्यांदा नियुक्ती झाली. युरोपियन देशांमध्ये जर्मनी आणि भारत यांच्यातले व्यापारी संबंध सर्वात महत्त्वाचे आहेत. आता डिनर डिपोल्मसी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अँजेला मार्केल यांच्याशी काय चर्चा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.